Friendship Day Quotes in Marathi that you can share with your pals
Friendship Day Quotes in Marathi one can share with your buddies on the occasion of Happy Friendship Day, to be observed on August 2nd, Sunday this year.
Friendship Day will be observed on August 2, 2020, this year in India. It is celebrated on the first Sunday of August every annual year. In several countries, this special day dedicated to the bond of friendship is celebrated on July 30 each year as well.
On the occasion of Happy Friendship Day, friends promise to stay with each other through thick and thin by tying friendship bands to one another, exchanging gifts, and wishing with adorable messages, quotes, or wishes. So make this Happy Friendship Day an unforgettable by sending across your wishes to your buddies via some wonderful Friendship Day Quotes in Marathi.
Here is a special collection of Happy Friendship Day Quotes in Marathi especially curated for you. Take a look-
Happy Friendship Day Quotes In Marathi
"जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही "- गौतम बुद्ध
"मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात"… - व.पू. काळे
"जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो".Happy Friendship Day 2020
"मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे" - महात्मा गांधी
"जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते"…
"दुखाशिवाय सुख नाही दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही"…..
"मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात" - अब्राहम लिंकन
"मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही". Happy Friendship Day 2020
"मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री" - पु. ल. देशपांडे
"मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं"
"रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात"…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून केली तर आपण त्यांच्याशिवाय एक मिनीटही राहू शकणार नाही"Happy Friendship Day 2020
"ञीच नातं एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, “मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस.” त्यावर लाट म्हणाली ,” अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली..”
"चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखा असते. तुम्ही त्याला कितीही तोडा, घासा, पिरघळा त्यातून गोडवाच बाहेरयेतो".Happy Friendship Day 2020
"जीवन आहे तर आठवणी आहेत,आठवण आहे तर भावना आहेत, भावना आहे तिथे मैत्री आहे,आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तू आहे!" जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published By : Aishwarya Rai
Published On: 1 August 2020 at 22:45 IST